प्रकाश राज: खलनायक ते दिलदार माणूस – त्यांच्याबद्दल या खास गोष्टी माहिती असायलाच हव्या
अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये ‘व्हिलन’ साकारून प्रकाश राज ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. बंगळुरूमध्ये जन्मलेले प्रकाश राज हे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. प्रकाश राज यांना तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पहिला राष्ट्रीय पुरस्कार १९९८मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट ‘अंतपुरम’साठी मिळाला होता. दुसरा राष्ट्रीय पुरस्कार २००२मध्ये आलेल्या ‘धाया’ या तमिळ चित्रपटासाठी मिळाला होता. २००७मध्ये आलेल्या ‘कांचीवरम’ या तामिळ चित्रपटासाठीही त्यांचा गौरव करण्यात आला होता. तर, तिसरा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना २०१०मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘पुथक्काना हायवे’ साठी निर्माता म्हणून मिळाला.
१९८८मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रकाश राज यांनी २००२ मध्ये ‘शक्ती: द पॉवर’मध्ये शार्पशूटरच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर ते २००३मध्ये आलेल्या ‘खाकी’ चित्रपटातही दिसले होते. पण, २००९मध्ये आलेल्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटात गनी भाई ही भूमिका साकारून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली होती.
…आणि राय चे झाले राज!
प्रकाश राज यांचे खरे नाव प्रकाश राय होते. त्यांनी बालचंदर यांच्या अभिनय शाळेत अभिनयाचे धडे गिरवले होते. त्यांचा जन्म तुलू भाषिक कुटुंबात झाला. के बालचंदर यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटातच त्यांचे नाव प्रकाश राज ठेवले. प्रकाश राज यांचा हा चित्रपट इतका यशस्वी झाला की, त्यांनी आपले आडनाव ‘राय’वरून राज केले.
पत्नी ललिता यांनी प्रकाश राजपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला
५७ वर्षीय प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिता कुमारी यांच्याशी २५ डिसेंबर १९९४ रोजी लग्न केले होते. या जोडीला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. मात्र, त्यांच्या मुलाने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. पतंग उडवताना सिद्धू टेबलावरून खाली पडल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. तब्बल महिनाभर चाललेल्या उपचारानंतर अखेर या चिमुकल्याने मृत्यूसमोर हार स्वीकारली होती. ललिता आपल्या मुलाच्या निधनामुळे इतक्या दु:खी होत्या की, त्यांनी प्रकाश राजपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखेर या घटनेच्या ५ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.
या ५ वेबसीरीज ओटीटी वर धुमाकूळ घालताय
१३ वर्षांनी लहान असलेल्या पोनीसोबत बांधली लग्नगाठ
जेव्हा, प्रकाश आणि ललिता हे घटस्फोट घेत होते, तेव्हा त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेली ३२ वर्षांची कोरिओग्राफर पोनी वर्मा त्यांच्या आयुष्यात आली. प्रकाश यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, तेव्हा पोनी त्यांच्या एका चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन करत होता. तिच्यासोबत काम करत असताना, प्रकाश राज यांना जाणवू लागले की केवळ तीच त्यांचे बिघडलेले जीवन सुधारू शकते. दुसरीकडे, पोनी देखील प्रकाश राज यांच्यावर खूप प्रभावित झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री खूप घट्ट होत गेली आणि मग एक दिवस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २४ ऑगस्ट २०१० रोजी दोघांचे लग्न झाले. या जोडीला एक मुलगा देखील आहे.
2 thoughts on “प्रकाश राज: खलनायक ते दिलदार माणूस – त्यांच्याबद्दल या खास गोष्टी माहिती असायलाच हव्या ”