मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही मोबाईल वरून फॉर्म भरला असेल, आणि नारीशक्ती app वरून आणि अनेकांकडून काही चुका झाल्या असतील, तर आता तुम्हाला त्या सुधारण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी जन्मतारीख चुकीची टाकली आहे, काहींनी मोबाईल नंबर चुकीचा टाकला आहे, तर काहींनी आधार क्रमांक किंवा डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड केले आहेत. आता तुम्ही या चुका सुधारू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जात सुधारणा कशी करायची?
सर्वात आधी, लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त एकदाच संधी मिळणार आहे. त्यामुळे घाई करू नका आणि योग्य माहिती भरून घ्या. चला तर मग, पाहूया सुधारणा कशी करायची:
प्ले स्टोअरवर जा आणि app अपडेट करा:
- तुमच्या मोबाइलमध्ये प्ले स्टोअर उघडा.
- संबंधित app अपडेट करून घ्या.
अर्जात लॉगिन करा:
- app ओपन करा आणि तुम्हाला ‘केलेल्या अर्ज’ या ऑप्शनमध्ये तुमचा अर्ज दिसेल.
- त्या अर्जावर क्लिक करा.
अर्जात बदल करा:
- र्जदाराची संपूर्ण माहिती आणि अपलोड केलेले कागदपत्रे दिसतील.
- लक्षात ठेवा, फक्त एकदाच बदल करता येईल. त्यामुळे काळजीपूर्वक माहिती भरा.
- नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स, इत्यादी बदलू शकता.
चुकीचे डॉक्युमेंट बदलणे:
- चुकीचे अपलोड केलेले डॉक्युमेंट बदलण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील डिलीट बटणावर क्लिक करा.
- नवीन डॉक्युमेंट अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा:
- सर्व माहिती तपासून योग्य बदल केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- एकदा सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज पात्र होईल.
लाडकी बहिन योजनेचा निधी अर्ज कधी मंजूर होईल?
मुख्यमंत्री पूर्वीच्या लाडकी बहिन योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी हजारो अर्ज सादर केले. मात्र, सध्या अनेक अर्ज प्रलंबित आहेत. आजच्या ब्लॉगद्वारे आम्ही अर्ज मंजूरी प्रक्रियेबद्दल आणि अर्ज पात्र आहे की नाही याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
तुम्ही प्रथम पूर्ण केलेल्या अर्जामध्ये सर्व दस्तऐवज योग्यरित्या अपलोड केले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती बरोबर भरली आहे की नाही ते तपासा. काळजी करू नका, जर तुम्ही ही सर्व माहिती अचूक भरली असेल तर तुमचा अर्ज १००% मंजूर होईल.
आणि ज्यांनी अंगणवाडीत अर्ज भरले आहेत त्या सर्वांचे अर्ज अगोदर मंजूर केले जातील, कारण आराखड्याची मंजुरी अंगणवाडीतच होणार आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra साठी येथे online अर्ज करा, कागदपत्रे आणि अटी जाणून घ्या!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाचे
- तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आणि रेशन काढणे पत्र असले पाहिजे.
- नवीन जीआर वर आधारित व्हिडिओ तयार केला आहे, तोही पाहा.
- चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नवीन अपडेट्ससाठी.
मित्रानो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा…
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: आता तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता |असा करा अर्जात बदल ?”