Best Investment Schemes for Daughters: जर तुम्हीही मुलीचे वडील असाल तर आजच तुमच्या मुलीच्या नावावर अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमची मुलगी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम (Securing future through Investment Schemes) होईल.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. पालक आपल्या आर्थिक मिळकतीतून आपल्या परीने तशी तजवीज करतही असतो. यासाठी बँक तसेच शासन मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. तर आजच तुमच्या मुलीच्या नावावर अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमची मुलगी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. अशाच काही योजनांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना (Best Investment Schemes for Daughters –Sukanya Samriddhi Yajana)
(Overview of Sukanya Samriddhi Yojana) मुलींसाठीच्या शासकीय योजनांमध्ये पाहिलं नाव येतं सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana (SSY). ही योजना भारत सरकार विशेषतः मुलींसाठी चालवते. या योजनेत १५ वर्षे सातत्यानं गुंतवणूक करावी लागते आणि २१ वर्षांनी ही योजना मॅच्युअर होते. ज्या पालकांच्या मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या यावर ८.२ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. तुम्ही सध्याच्या व्याजदरानुसार गणना केल्यास, तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर तुमच्या मुलीला ६९,२७,५७८ रुपये मिळतील. जर तुम्ही दरमहा ५ हजार रुपये म्हणजेच वार्षिक ६० हजार रुपये गुंतवले तर २१ वर्षांनंतर तुमच्या मुलीला २७,७१,०३१ रुपये मिळतील.
(SSY benefits) या योजनेचे लाभ
1 | मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय | या योजनेतून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी काही रक्कम मिळत असते , जी मुलींच्या शिक्षणात एक आर्थिक सुरक्षितता निर्माण करते. |
2 | उच्च व्याजदर: | सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दिला जाणारा परतावा ( SSY interest rate ) तसेच त्यावरील व्याज हे चांगले आहे, ज्यामुळे गुंतवलेली रक्कम हि चांगली आर्थिक परतावा देते. |
3 | कर मुक्त | या योजनेतील गुंतवणुकीवर कर नाही त्यामुळे करापासून सुटका मिळते. |
4 | नियमित बचत: | सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुमच्या बचतीला नियमिततेने वाढ देण्यात मदत करते. |
5 | सुरक्षित गुंतवणूक : | हि एक शासकीय योजना असल्याने जोखीम खूपच कमी आहे, म्हणजेच हि एक सुरक्षित गुंतवणूक आहे. |
6 | मुलीला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनण्यास मदत : | हि योजना तुमच्या मुलीला आर्थिक स्वतंत्रता देण्यात मदत करते, त्यामुळे ती आपल्या भविष्यात अधिक स्वतंत्र होऊ शकते. |
Post Office Scheme for woman| महिलांसाठी पोस्ट ऑफिसची या भन्नाट योजना, आहेत खूपच भारी
महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Savings Certificate)
1 | महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. |
2 | अल्पवयीन मुलींसाठी, त्यांचे पालक खातं उघडू शकतात. |
3 | ही एक डिपॉझिट स्कीम आहे, ज्यामध्ये ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. |
4 | या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. |
5 | योजना दोन वर्षांनी मॅच्युअर होते. अशा स्थितीत उत्तम व्याजही मिळतं आणि नफाही होतो. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांनी २,३२,०४४ रुपये मिळू शकतात. |
पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund)
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक योजना आहे ज्यामध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
- तुमची मुलगी अल्पवयीन असेल, तर पालक तिच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- या योजनेत ७.१ टक्के दरानं व्याज मिळतं. या योजनेतही वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
- ही योजना १५ वर्षांनी मॅच्युअर होते.तुम्ही इच्छित असल्यास, तुम्ही ही स्कीम ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.
- या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवल्यास, १५ वर्षांनंतर तुमच्या मुलीला ४०,६८,२०९ रुपयांची मालक होईल.
- जर ५ वर्षांसाठी कालावधी वाढवल्यास २० वर्षांनी तुमची मुलगी ६६,५८,२८८ रुपयांची मालक होईल.
वरील लेखातील माहिती महत्वाची वाटल्यास तुमच्या मित्रांना पाठवा आणि अश्याच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईट सोबत कनेक्त राहा.
1 thought on “Best Investment Schemes for Daughters : मुलीच्या भविष्यासाठी या योजना आहेत खूपच फायदेशीर”