bsnl fiber basic plan : BSNL कडून दोन धमाकेदार प्लॅन! 4000GB डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन मोफत!

bsnl fiber basic plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन स्वस्त प्लॅन लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये सादर करण्यात आले आहेत. ताज्या अहवालानुसार, हे दोन्ही बजेट फ्रेंडली प्लॅन्स आहेत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅन्समध्ये यूजर्सना 4000GB डेटाची सुविधा दिली जाईल. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये यूजर्सच्या मनोरंजनाची देखील काळजी घेतली गेली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना OTT चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. या  प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स आपण जाणून घेऊया.

bsnl fiber basic plan

bsnl fiber basic plan डेटा आणि OTT साठी उत्तम प्लॅन्स

BSNL च्या नव्या ब्रॉडबॅंड प्लॅन्सची किंमत 599 रुपये आणि 699 रुपये आहे. 599 रुपयांचा प्लॅन BSNL फायबर बेसिक OTT म्हणून सादर करण्यात आला आहे. तर, 699 रुपयांचा प्लान BSNL फायबर बेसिक सुपर म्हणून सादर करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, सध्या हे दोन्ही प्लॅन्स कंपनीच्या साइटवर सूचीबद्ध नाहीत. मात्र, या अहवालात दोन्ही योजनांचे सर्व फायदे समोर आले आहेत.

BSNL Fiber Basic OTT: मोठा डेटा आणि मनोरंजनाचा डबल धमाका! 

वर सांगितल्याप्रमाणे, Fiber Basic OTT Plan ची किंमत 599 रुपये इतकी आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना 75 Mbps स्पीडने 4TB किंवा 4000GB मासिक डेटा प्रदान करतो. 4000GB डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 4 Mbps पर्यंत कमी होतो. नावावरून समजले असेल की, हा प्लॅन OTT फायद्यांसह सुसज्ज आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना Disney + Hotstar Super च्या स्वरूपात OTT सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

बहुप्रतीक्षित Google Pixel 8a Launch Date In India |भारतातही लाँच होणार!

BSNL Fiber Basic Super Plan

BSNL च्या फायबर बेसिक सुपर प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनची किंमत 699 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 599 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे वापरकर्त्यांना 4TB मासिक डेटाचा ऍक्सेस मिळतो. जर तुमचा दैनंदिन कोटा संपला तर, या प्लॅनचा इंटरनेट स्पीड 8Mbps इतका कमी होतो. मात्र, या प्लॅनअंतर्गत उपलब्ध इंटरनेटचा वेग 125 Mbps आहे. या प्लॅनमध्ये मोफत फिक्स्ड-लाइन कनेक्शन देखील दिले जाते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधेचा समावेश आहे.

 मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या टेक्नॉलॉजी या पेजला नक्की भेट देत रहा.

Leave a Comment