CHATRAPATI SAMBHAJINAGAR NEW COLLECTTOR: बऱ्याच दिवसापासून पोस्टिंगच्या वेटिंगमध्ये असलेली सोलापूर झेडपीचे माजी सीईओ दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.
CHATRAPATI SAMBHAJINAGAR NEW COLLECTTOR
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बदली झाली असून पुणे येथील भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी नवे जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी स्वामी आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. बुधवारी (दि.14) काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून यामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश आहे. पांडेय यांची पुणे येथील भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे
संभाजीनगरचे नवीन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री दिलीप स्वामी आस्तिक कुमार पांडे यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून रुजू होतील, यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत CEO म्हणून दमदार कामगिरो भूषवली आहे.
UPSC EXAM 2024 | UPSC मध्ये सहाय्यक संचालकासह अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
अनेक नावे चर्चेत होती मात्र, दिलीप स्वामी यांचे नाव कायम आघाडीवर होते. आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून त्यांचीच नियुक्ती झाली आहे. पांडेय यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी म्हणून संभाजीनगरचा पदभार स्वीकारला होता. आपल्या 14 महिन्यांच्या कार्यकाळात जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. तर खंड पडलेला आंतरराष्ट्रीय वेरूळ-अजिंठा महोत्सवाला नव्याने सुरू केला. त्यांच्या पुढाकारानेच दोन महोत्सव यशस्वीपणे पार पडले.
Shri. Dilip Swami
श्री. दिलीप स्वामी हे छत्रपती संभाजीनगर मध्ये लवकरच रुजू होणार आहेत.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.