Goli Vada Pav Success Story In Marathi: गोली वडापाव कशी झाली कोट्यवधीची कंपनी, नक्की वाचा!

Goli Vada Pav Success Story In Marathi: आज आपल्या देशात प्रत्येक तरुण नवीन व्यवसायाच्या यशोगाथा बनवत आहेत. प्रत्येकाची नवीन संघर्षाची यशोगाथा तयार होत आहे. हेच कारण आहे की आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत आहे.

बिजनेस विश्वातील सक्सेस स्टोरी आपण भरपूर वाचली असेल जसं की स्टार्टअप फाउंडर नी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आज अनेक कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. आज अशीच एक सक्सेस स्टोरी आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एक स्टार्टअप फाउंडर ने कशी वडापावच्या माध्यमातून आपली कंपनी कोट्यवधीची बनवली.

https://youtu.be/d2h3cQ8ZWgQ?si=SxMBZ3cCJTOvs8JW

या ठिकाणी आम्ही बोलत आहोत वेंकटेश अय्यर यांच्या बद्दल ज्यांनी गोली वडापाव या नावाने आपला बिजनेस सुरू केला आणि आज त्यांचा हा बिजनेस कोट्यवधीचा व्यवसाय बनलेला आहे. आजच्या या लेखात आपण गोली वडापावची यशोगाथा वाचणार आहोत आणि व्यंकटेश अय्यर यांनी कसे वडापावच्या माध्यमातून कोट्यवधीची कमावले हे जाणून घेणार आहोत.

Goli Vada Pav Success Story In Marathi: अशी झाली गोली वडापावची सुरुवात

व्यंकटेश अय्यर यांचा जन्म दक्षिण भारतातील एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना लहानपणी अभ्यासात जराही रस नव्हता. ज्यामुळे त्यांना घरात नेहमी ऐकावं लागेल की अभ्यास नाही केला तर तुला नोकरी कोण देईल. व्यंकटेश यांच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमी वाटे की व्यंकटेश पुढे जाऊन काहीच करू शकणार नाही. 

परंतु व्यंकटेश यांचा कल वेगळाच होता त्यांना व्यवसायाची आवड होती. व्यंकटेश हे मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी आले, तेव्हा मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट बघून त्यांना एक कल्पना आली की विदेशी बर्गर भारतात एवढा लोकप्रिय होऊ शकतो तर आपल्याकडील एखादा पदार्थ आपण असा लोकप्रिय करू शकत नाही का?

याबाबत त्यांना असं वाटलं की वडापावच आपण का लोकप्रिय करू शकणार नाही. 2004 मध्ये व्यंकटेश यांनी गोली वडापाव या नावाने आपला वडापावचा व्यवसाय सुरू केला. इथूनच व्यंकटेश अय्यर यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली.

सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला

व्यंकटेश अय्यर यांनी जेव्हा 2004 मध्ये आपल्या वडापावच्या व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि सातत्यपूर्ण ते आपला व्यवसायाकडे लक्ष देऊ लागले. त्याचाच परिणाम आहे की आज गोली वडापाव कोट्यवधीची कंपनी बनली आहे. 

व्यंकटेश अय्यर यांना भारतीय व्यावसायिक नारायण मूर्ती यांच्या बद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे आणि ते त्यांच्या यशाचं कारण आहे. याच कारणामुळे व्यंकटेश हे नेहमी गरजू लोकांना मदत करत असतात.

गोली वडापावचे आज 300 पेक्षा जास्त Outlets आहेत.

व्यंकटेश अय्यर यांनी गोली वडापाव कंपनी 2004 मध्ये सुरू केली होती, आणि आज संपूर्ण देशभरात गोली वडापाव चे 300 पेक्षा जास्त आउटलेट्स आहे. ज्यामुळे आज ही कंपनी 50 कोटी पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल करते.

हे नक्की वाचा

Zepto Success Story In Marathi: वयाच्या 19 व्या वर्षी कॉलेज सोडून या तरुणांनी केली 11000 कोटीची कंपनी उभी, वाचा संपूर्ण स्टोरी

गोली वडापाव यशोगाथा Overview

व्यवसायसंपूर्ण माहिती
स्थापना वर्ष२००४
संकल्पनामुंबईतील स्ट्रीट फूड वडापावला जागतिक स्तरावर ब्रँड बनवणे हे लक्ष्य
एकूण भांडवलएक कोटी रुपये
व्यवसाय विस्तारीकरणवडापावच्या देशभरात ३०० पेक्षा जास्त स्टोअर १०० शहरे आणि २० राज्यामध्ये आहे.
Goli Vada Pav Success Story In Marathi

गोली वडापाव यशोगाथा मुलाखत

https://youtu.be/qCxVwtqnEiQ?si=hqA3NhGT3qaPYAL1
Goli Vada Pav owner Interview

आम्हाला आशा आहे की हे आर्टिकल आपल्याला आवडले असेल, आणि गोली वडापावची यशोगाथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. असेच नवनवीन आर्टिकल वाचण्यासाठी आमची वेबसाईट Royalsheti.in ला नक्की कनेक्ट व्हा.

Leave a Comment