google pixel 8a launch date in india: अलीकडेच Google I/O इव्हेंट दरम्यान कंपनी Pixel 8a चे अनावरण करू शकते, अशा बातम्या सुरु होत्या. आज या फोनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो की, Google Pixel 8a ची बॅटरी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS वर सूचीबद्ध आहे. त्यामुळे हा फोन जागतिक स्तरावर तसेच भारतातही लाँच केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
google pixel 8a launch date in india, BIS लिस्टिंग
मॉडेल क्रमांक GVYZ7 सह मोबाईल फोन या BIS वर आला आहे. या सूचीद्वारे Google Pixel 8a फोनच्या बॅटरीबद्दल माहिती मिळाली आहे, जी लिथियम बॅटरी असणार आहे. अलीकडेच UL Demko सर्टिफिकेशनवर Pixel 8A ची बॅटरी क्षमता देखील समोर आली होती. त्यानुसार, यामध्ये 4,558mAh रेट केलेली बॅटरी असू शकते. जी लाँच दरम्यान 5,000mAh पर्यंतची बॅटरी असू शकते.
Google Pixel 8a: भारतात येण्याची शक्यता?
कंपनीने Pixel 8A बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, Google I/O 2024 इव्हेंट 14 मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे हा Pixel स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत इव्हेंटदरम्यान घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. Google 14 मे रोजी कॅलिफोर्नियामध्ये या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण भारतात देखील केले जाणार आहे.
Google Pixel 8a: लीक स्पेसिफिकेशन्सवर एक नजर
लीकनुसार, Google Pixel 8A स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन OLED पॅनेलवर बनवली जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असण्याची शक्यता आहे. फोनच्या प्रोसेसरबद्दल देखील लीक समोर आले आहेत. Pixel 8a मोबाईल फोन गुगलचा स्वतःचा पॉवरफुल चिपसेट Tensor G3 सह बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB LPDDR5X रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज असू शकते. फोटोग्राफीसाठी, Pixel 8a फोन 64MP Sony IMX787 लेन्स आणि 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह येऊ शकतो. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP Sony IMX712 लेन्स कॅमेरा उपलब्ध असेल. मात्र, फोनच्या स्पेक्सबद्दल सर्व योग्य माहिती लाँचनंतरच कळेल.
smartphone storage capacity : तुमच्या फोनचे स्टोरेज फुल्ल झालंय? ह्या 10 भन्नाट ट्रिक जाणून घ्या.
- BIS वर लिस्टिंगमुळे अनेक तज्ज्ञ भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
- अधिकृत घोषणा 14 ते 18 मे 2024 दरम्यान होणाऱ्या Google I/O 2024 इव्हेंटमध्ये होऊ शकते.
Google Pixel 8a ची घोषणा 14 ते 18 मे 2024 दरम्यान होणाऱ्या Google I/O 2024 इव्हेंटमध्ये होण्याची शक्यता आहे. भारतात लाँच झाल्यास, OnePlus Nord 3, Xiaomi 12S आणि Realme GT Neo 4 सारख्या स्मार्टफोन्सना हा फोन कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत रहा
2 thoughts on “बहुप्रतीक्षित google pixel 8a launch date in india |भारतातही लाँच होणार!”