गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत ,रोज सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिताना रिफाईंड साखरेचा चहा पीत असाल तर थांबा,कारण तुम्हाला आजारांना दूर ठेवायचं असेल तर, तर चहामध्ये गुळाचा वापर आजच सुरू करा. हे सांगण्याच कारण म्हणजे गुळाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आता सिद्ध झालय.
Table of Contents
गुळाचा चहा पिण्याचे फायदे
गुळाचा चहा कसा तयार करावा ?
कारण गुळ हा रासायनिक प्रक्रिया न झाल्यामुळे शुद्ध असतो, तर रिफाईंड साखर आज अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. तुम्ही चहामध्ये चहापत्ती, लवंग, दालचीनी, तुळस, आले, आणि गूळ या सर्वांना एकत्र करत1 छान गुळाचा चहा बनवू शकता. दुधाच्या चहामध्ये गूळ टाकून पिणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. गुळाच्या चहामध्ये आयर्न, फायबर, पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. कारण यातून इम्युनिटी तर वाढतेच सोबतच पचनक्रिया देखील सुधारते. गुळाचे आणखी फायदे जाणून घ्या..
गुळाचा चहा पिण्याचे फायदे (Top 8 Benefits of Jaggery Tea)
१) सर्दी आणि व्हायरल आजारांपासून दूर ठेवण्यास उपयुक्त– (Jaggery Tea Benefits You Should Know) जर आपण गुळाच्या चहामध्ये लवंग, दालचीनी, आले, तुळस, गवती चहा, पुदिना हे एकत्र करून चहा तयार केला, तर तो चहा एंटीऑक्सीडंट और अँटीवायरल युक्त बनतो.
२) सांधे दुखी कमी करण्यास उपयुक्त – गुळाच्या चहामध्ये खनिज, आणि प्रोटीन्स हे घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, जे सांधेदुखी आणि हाडांच्या आजारांना कमी करण्यास उपयुक्त ठरते.
३) ऍनिमिया पासून सुटका– शरीरातील हिमोग्लोबीनचं संतुलन ठेवण्यास आयर्न खूप महत्वाचे असते. गुळामध्ये आयर्न जास्त प्रमाणात उपलब्ध असते, आयर्न शरीरातील प्रत्येक भागात रक्त पोहोचण्याचे काम करते, गुळाचा चाय पिल्याने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. जर तुमच्या शरीराला रक्ताची कमतरता असेल तर गुळाच्या चहाचे सेवन करणे उपयुक्त ठरते.
४) इम्युनिटी मजबूत करते – आयुर्वेद सांगते हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. वातावरणातील बदलामुळे अनेक वेळा आपण आजारी पडतो परंतु आपण नेहमीच गुळाचे चहा पीत असाल तर आपली प्रतीरोधक क्षमता वाढते. यासोबतच चहामध्ये अद्रक आणि गूळ एकत्र केला तर आयर्नची कमतरता पूर्ण होते, झिंक, सेलेनियम, मिनरल्स यासारखे पोषक तत्व सक्रिय होतात, ज्यामुळे आपली इम्युन सिस्टम चांगली होते.
गुळाचा चहा पिल्याने होतात हे फायदे
५) वजन कमी करण्यास उपयुक्त – जर तुमची वजन वाढत असेल तर तुम्हाला गुळाचा चहा आजच सुरू करावा लागेल. कारण गुळात असे पोषक तत्व असतात जे शरीरातील कॅलरी नैसर्गिकरीत्या कमी करतात. यासोबतच गुळाचा चहा मेटाबॉलिज्म वाढवतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते.
६) पचनक्रिया सुधारते – जर तुम्हाला नेहमी अपचनाचा त्रास होत असेल तर गुळाचा चहा नक्की सेवन करा, विशेषतः कब्ज असणाऱ्यांना गुळाचा चहा खूपच फायदेशीर आहे, जर आपण नेहमी गुळाचा घेत असाल तर, पचनक्रिया सक्रिय होते, ज्यामुळे आपण अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळते, नियमित चहा मध्ये साखर पीत असाल तर आता गुळाची सुरुवात करा.
७) कफ आणि दमा असेल तर नक्की गुळाचा चहा प्या– तुम्हाला जर दम्याचा त्रास असेल तर गुळाचा चहा नक्की प्या, गुळाचा चहा दमा कमी करण्यास मदत करते, सोबतच वारंवार कफ होत असेल तर कफ कमी करण्यास गुळाचा चहा फायदेशीर आहे.
८) रक्त शुद्ध होण्यास उपयुक्त – गुळामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्त अशुद्ध असेल तर अनेक आजारपणे मागे लागू शकतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध ठेवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. याचा तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवरही चांगला परिणाम होतो. यासाठीच नियमित गूळ खाण्याचा अथवा गुळाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
गुळाचा चहा कसा तयार करावा ? (How to make Jaggery Tea Recipe)
साहित्य- (jaggery tea with milk)
- एक कप पाणी
- आले
- गवती चहा
- गुळ
दोन कप गुळाचा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी घ्यावे. त्यात आले, गवती चहा, व आवश्यक तेवढा गुळ हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे. तोपर्यंत दूध दुसऱ्या भांड्यात उकळण्यास ठेवावे. चहा उकळून झाल्यानंतर गॅस बंद करावा, आणि चहाचे भांडी खाली उतरून घ्यावे, व त्यात उकळलेले कपभर दूध घालावे.आणि दोन कप चहा तयार झाला.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
3 thoughts on “गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का,हिवाळ्यात तर प्यायलाच हवा Health Benefits Of Jaggery Tea In Marathi”