How to Apply Mudra Loan : 10 लाखांचे सरकारी योजनेतून बिझनेस लोन मिळवण्यासाठी, असा करू शकता अर्ज?

How to Apply Mudra Loan : आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सरकारची पीएम मुद्रा योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती. 

How to Apply Mudra Loan

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

सदरील योजनेअंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. सदरील कर्ज मुद्रा लोन म्हणून सुध्दा ओळखले जाते.

मुद्रा कर्ज योजना ही लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत,उद्योजक ₹50,000 ते ₹10 लाख पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

Mudra Loan योजनेचे उद्देश (Objectives of Mudra Loan Scheme)

लहान उद्योगांसाठी सरळ आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याचा उद्देश मुद्रा लोन योजनेचा आहे. ग्रामीण भागातील खूप प्रमाणात बेरोजगारी आहे. तसेच बेरोजगारांना योजनेमार्फत लाभ मिळवून व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा हेतू मुद्रा लोन योजनेचा आहे. लहान व्यवसायासाठी लोकांना कर्ज देऊन स्वतः व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देणे. व रोजगार चालू करायला कर्ज देणे. आणि व्यवसाय मोठा व क्षमता वाढवण्यासाठी कर्ज देण्याचा मुख्य उद्देश या योजनेच्या आहे.

Mudra Loan अंतर्गत कोण कर्ज मिळवू शकते?

एकल मालक (सोल प्रोपराइटर)
पार्टनरशिप
सेवा क्षेत्रातील कंपन्या
सूक्ष्म उद्योग
दुरुस्तीची दुकाने
ट्रक मालक
अन्न संबंधित व्यवसाय
माइक्रो मेनूफैक्चरिंग फर्म
How to Apply Mudra Loan

Types of PM Mudra Yojana

1. शिशू :- या श्रेणीत ₹50,000 पर्यंतचे कर्ज मिळते. नवीन उद्योजक आणि ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी निधीची आवश्यकता आहे अशा उद्योजकांसाठी ही श्रेणी आहे.

2. किशोर :- सदरील श्रेणीत ₹5 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.ज्या उद्योजकांनी आधीच व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता आहे अशा उद्योजकांसाठी ही श्रेणी आहे.

3. तरुण :- मुद्रा लोन श्रेणीत ₹10 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.ही मुद्रा कर्ज योजनेतील सर्वाधिक रक्कम आहे.आवश्यक पात्रता पूर्ण करणारे उद्योजक ₹10 लाख पर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मुद्रा कर्ज योजना पात्रता

  • भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
  • पात्र व्यवसायासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे.
  • योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अर्जदाराचा कायमचा पत्ता
  • व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील तीन वर्षांचे Balance Sheet
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.

How to Apply Mudra Loan

तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही उद्यम मित्र पोर्टल www.udyamimitra.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Onlineअर्ज करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून Mudra Loan अर्ज डाउनलोड करा.
आता हा download केलेला अर्ज व्यवस्तीत भरून घ्या सोबतच आवश्यक कागदपत्रे जोडा.
reference ID किंवा क्रमांक मिळविण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
कर्जाची औपचारिकता पुढे नेण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. त्यामुळे संदर्भ आयडी क्रमांक तुमच्याजवळ जपून ठेवा.
कर्जाचा अर्ज आणि कागदपत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, कर्जाची रक्कम मंजूर केली जाईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात वितरित केली जाईल.
कर्जदार MUDRA कर्जासाठी उद्यम मित्र पोर्टलवर देखील (www.udyamimitra.in) ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

हे हि वाचा: Mahila Bachat Gat Registration | असा करा महिला बचत गट नोंदणी अर्ज संपूर्ण माहिती.

Offline अर्ज करण्याची प्रक्रिया:
PMMY अंतर्गत MUDRA कर्ज ऑफर करण्यासाठी पात्र असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या
बँकेच्या काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह कर्ज अर्ज भरा आणि सबमिट करा
बँकेसोबत कर्जाची पुढील सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया पूर्ण करा
सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, अर्ज मंजूर केला जाईल
कर्ज मंजूरीनंतर, इच्छित रक्कम निर्दिष्ट कामाच्या दिवसांत नमूद केलेल्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज जमा करा.तुमचा अर्ज अनेक कर्ज देणाऱ्या संस्थांना दिसेल.

  • अधिक माहितीसाठी मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
  • मुद्रा योजनेच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करा: 1800-180-1111

मित्रांनो, मुद्रा योजना काय आहे? (How to Apply Mudra Loan) हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर तुमच्या मित्रांपैकी किंवा नातेवाइकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हि पोस्ट नक्की share करा.

3 thoughts on “How to Apply Mudra Loan : 10 लाखांचे सरकारी योजनेतून बिझनेस लोन मिळवण्यासाठी, असा करू शकता अर्ज?”

Leave a Comment