Morning Yoga care: आजच्या धकाधकीच्या काळात निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. शरीर तंदुरुस्त असेल तर आज़ार हि दूर राहतात. सकाळच्या फ्रेश वातावरणात योगा करणे तर खूपच महत्वाचे आहे. योगामुळे तुम्हाला उर्जा मिळते. तुम्ही स्वतःला उत्साही ठेवण्यास सक्षम बनता. तुमच्या काम करण्याची क्षमता वाढते..
प्रत्येकजण आपल्या पद्धतीने योगा करत असतो, परंतु योगा करताना काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजे.योगा करताना काय करावे किंवा योगा केल्यानंतर काय करावे यासाठी तज्ञ् काय सांगतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे.चला जाणून घेऊया योग केल्यानंतर काय केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकेल.
Morning Yoga care : योगा केल्यानंतर हे नियम पाळा
शरीराला रिलॅक्स करा
योगासन केल्यानंतर त्याचे फायदे मिळवायचे असतील तर शरीराला आरामही तितकाच महत्वाचा आहे. योगा केल्यानंतर लगेच आपल्या दैनंदिन कामाला सुरुरवात करू नका.यामुळे तुमचा ताण कमी होण्याऐवजी वाढू शकतो. योगानंतर नेहमी आराम करा, थोडा वेळ बसा आणि नंतर काही काम करा.
थोडावेळ चालण्याचा व्यायाम करा
योगासने केल्यानंतर थोडावेळ चालण्याचा सराव करावा. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. चालताना तुमचे शरीर मोकळे राहते. योगासन केल्यानंतर मुक्त भ्रमंती केल्यानंतर शरीराला स्फूर्ती मिळते व थकवा हि दूर होतो.
पाणी सावकाश प्या
योगासन करताना घाम आला तर शरीरात निर्जलीकरण होते. अशा स्थितीत योगानंतर लगेच नव्हे तर १५-२० मिनिटांनी हळू हळू पाणी प्यावे.पाण्याने शरीरातील पाण्याचे कमतरता दूर होते.
योग केल्यावर अर्धा तास काहीच खाऊ नका.
योगासनांच्या शेवटी नेहमीच शवासन करावे.
तासाभराने स्नान करा.