पिठाची चक्की अर्ज सुरु. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने पिठाची चक्की ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. जाणून घेवूयात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती.
पिठाची चक्की अर्ज सुरु
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना द्वारे हि पिठाची चक्की योजना राबविली जात आहे.
पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉल मशीन या योजनेसाठी देखील अर्ज करता येणार आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 22 फेब्रुवारी 2024 च्या आत महिला व बाल कल्याण विभाग या कार्यालयात अर्ज सादर करून द्या.
कोणाला मिळेल लाभ
पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली अर्ज करू शकतात तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला अर्ज करू शकणार आहेत.
10 लाखांचे सरकारी योजनेतून बिझनेस लोन मिळवण्यासाठी, असा करू शकता अर्ज?https://royalsheti.in/how-to-apply-mudra-loan/#more-706
पिठाची चक्की अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणते लागतील.
अर्जदाराने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये अर्ज करायचे आहे.
योजनेसाठी लागणारा अर्ज आणि सर्व कागदपत्रे याठिकाणी देत आहोत खालील बटनावर क्लिक करून हि कागदपत्रे डाउनलोड करून घ्या.
- विहित नमुन्यातील अर्ज.
- शौचालयाबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला.
- पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
- गटविकास अधिकारी यांचे अभिप्राय प्रमाणपत्र.
वरील सर्व प्रकारचे कागदपत्रे असलेली pdf खालील बटनावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.
दिनांक 23 2 2019 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबधित कार्यालयात सादर करावीत जेणे करून योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकेल.
योजनेच्या अटी
एका अर्जदारास एकच योजनेसाठी अर्ज करता येईल.
तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
केवळ ग्रामीण भागातील अर्जदारच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अर्जदाराचे वय हे अर्ज करतेवेळी 17 पेक्षा कमी व 45 पेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा ५ वर्षाच्या आत लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निम शासकीय सेवेत नसावी.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा TCची छायांकित प्रत
अर्जदाराचा उत्पन्न दाखला.
आधार कार्डची छायांकित प्रत.
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
इलेक्ट्रिक बिलाची छायांकित प्रत
इत्यादी कागदपत्रे अर्ज करतांना सादर करावी लागणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या.
मित्रानो माहिती आवडली असेल, तर पेजला नक्की फॉलो करा..