Rose Farming In Polyhouse Full Infomation : पॉलिहाऊस मधील गुलाबशेती संपूर्ण माहिती

Rose Farming In Polyhouse Full Infomation: आपल्या देशात सध्या फुल शेतीला खूप मागणी आहे.

आपल्या देशात गुलाबाचा वापर सणा सुदीला समारंभाकरिता व कार्यालयाची शोभा वाढविण्याकरिता केला जातो, परंतु १९९० नंतर पॉलिहाऊसमधील उच्च जातीचा गुलाब उपलब्ध झाल्यानंतर लोकाचा कल बदलेला आढळतो. शिवाय डच जातीची फुले निर्यात करण्यासाठी ही मोठा वाव आहे.

Rose Farming In Polyhouse

आपल्या देशात गुलाबाचा वापर सणा सुदीला समारंभाकरिता व कार्यालयाची शोभा वाढविण्याकरिता केला जातो, परंतु १९९० नंतर पॉलिहाऊसमधील उच्च जातीचा गुलाब उपलब्ध झाल्यानंतर लोकाचा कल बदलेला आढळतो. शिवाय डच जातीची फुले निर्यात करण्यासाठी ही मोठा वाव आहे.

परंतु यासाठी उत्तम प्रतीचे फुले उत्पादीत करावी लागतात, त्याकरिता योग्य जातींची निवड, वातावरण नियंत्रण योग्य मशागत पद्धती, काढणीत्तोर तंत्रज्ञान व शीत साखळी इ. बाबींचा वापर करावा लागतो.

Rose Farming In Polyhouse Full Infomation : पॉलिहाऊस मधील गुलाबशेती संपूर्ण माहिती

जमीन / माती: माती ही लाल रंगाची लॅटराईट प्रकारची असावी त्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो, पॉलिहाऊसमधील निवडावयाच्या मातीचा सामू ६.५ ते ७.० च्या दरम्यान व क्षारता १ मी.मी. होज प्रति सें.मी. पेक्षा कमी असावी.

मातीचे निर्जतुकीकरण : लागवडीपूर्वी मातीचे निर्जुतुकीकरण करणे गरजेचे असते. पॉलिहाऊसमध्ये लावायच्या रोपांचा खर्च तुलनेने जास्त असल्यामुळे मातीमध्ये असणारे बुरशीजन्य रोग नियंत्रीत करावे लागतात. निर्जुतुकीकरणासाठी फॉरमॅलीन किंवा बासामीड वापरले जाते. याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.मातीमध्ये पाणी द्यावे.

  • वाफसा आल्यानंतर फॉरमॅलीन ५ टक्के प्रमाण किंवा बासामीड ४० ग्रॅम प्रती चौ.मी वापरावे Rose Farming In Polyhouse
  • .बासामीडसाठी जमीनवर खाली करावी लागते यामुळे बासामीड जमीनीत मिसळते. त्यानंतर झारीच्या साहाय्याने हलके पाणी मारावे. फॉरमॅलीनसाठी याची गरज नसते.
  • पूर्ण जमिनीवर काळ्या रंगाची पॉलीफिल्म पसरावी व फिल्मच्या तुकड्याच्या कडावर चारी बाजूंनी माती घालावी.
  • दोन तीन दिवस थांबावे, नंतर कागद काढुन भरपुर पाणी द्यावे.
  • वाफसा आल्यानंतर बेड बांधणी करावी Rose Farming In Polyhouse

बेड (गादी वाफे) बांधणी : हरितगृहातील पिके ही बेड (वाफा) करून लावली जातात. व निर्जुतुकीकरणापूर्वी मातीमध्ये वाळु अथवा भाताचे तुस व शेणखत मिसळावे लागते. त्याचे प्रमाण माती ६० टक्के, वाळू अथवा भाताचे तूस २० टक्के व शेणखत २० टक्के इतके आहे.गुलाब लागवड करण्याकरिता बेडची रूंदी ९० सेंमी व पायाची रुंदी ६० सेंमी असते. बेडची उंची २५ ते ३० सेंमी ठेवावी. एका बेडवर ४५ x २० सेंमी अंतरावर दोन ओळी / रांगा पद्धतीने लागवड करावी. गुलाबाची रोपे प्रति चौ.मी. ६ ते ७ घनतेने लावली जातात.

हवामान :

गुलाबाच्या लागवडीसाठी थंड व कोरडे हवामान आवश्यक असते. गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी आणि फुलांच्या जास्त उत्पादनासाठी तापमान २० ते ३० सें.ग्रे. व आर्द्रता ६० ते ६५ टक्या दरम्यान असावी लागते. परंतु यासाठी पूर्ण नियंत्रीत प्रकारची हरितगृह असावे लागते. परंतु महाराष्ट्रात मुख्यतः अंशत नियंत्रीत प्रकारची हरितगृहे उभारली जातात. यामध्ये वातावरण नियंत्रणासाठी पुढील पद्धतींचा अवलंब करावा लागतो.तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगर / मिस्टींग पद्धतीचा वापरतापमान व सूर्यप्रकाश तीव्रता कमी करण्यासाठी पॉलीफिल्मवर चुना मारणे.रितगृहातील मोकळ्या जागेमध्ये पाणी मारणे ५० टक्के शेडींग बेल्टचा वापर करणे.

जाती : झाडाची वाढ आणि जोमदारपणा, पाकळ्यांची संख्या, फुलांची संख्या, रंग, सुगंध, इत्यादी वैशिष्ट्यानुसार गुलाबांच्या जातींचे पाच प्रकार पडतात :- १. हायब्रीड टी २. फ्लोरीबंडा ३. पॉलीएन्था ४. मिनिएचर्स ५. वेली गुलाब इ.

परंतु महाराष्ट्रामध्ये व्यापारी तत्वावर ग्लॅडिएटर, सुपरस्टार, मॉटेझमा, पीस, हॅपीनेस, आयफेल टॉवर, लॅडारा, क्विन एलिझाबेथ, अभिसारिका व एडवर्ड या जातीची लागवड केली जाते. विशेषतः हरितगृहामध्ये लागवड करण्यासाठी डच गुलाब या जातीची निवड केली जाते.

अभिवृद्धीचा प्रकार : गुलाबाची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. रोझा इंडिका किंवा रोझा मल्टीफ्लोरा या जातीच्या खुंटावर डोळे भरले जातात.

लागवड करण्यापूर्वी १२ तास पॉलीथीन बॅगेला पाणी देवू नये. पॉलीथीन बॅग धारदार चाकूने किंवा ब्लेडने खालच्या बाजूने फाडावे, कलम खड्ड्यात अशाप्रकारे लावावे की कलमाचा सांधा जमिनीपासून ७ ते १० सेंमी. वर राहील. कलम लावल्यानंतर सर्व बाजूंनी माती लावावी व भरपूर पाणी द्यावे.

पिकाची निगा :-

रोपे लावल्यानंतर तीन आठवड्यांनी कळ्या यायला सुरुवात होते. आलेल्या कळ्या(Rose Farming In Polyhouse) खुडून टाकाव्यात यामुळे रोपांच्या फांद्या वाढुन पानांचे क्षेत्र वाढते. सर्वसाधारणतः तीन महिन्यानंतर रोपांच्या खालील बाजूने, फूटून आलेल्या फांद्या ठेवाव्यात. या फांद्या म्हणजे फुलांच्या दांड्या असतात. फुलाच्या दांडीला आलेले फुटवे काढून टाकावेत यामुळे मिळणारे फुल अधिक मोठ्या आकाराचे मिळते.फुलांची दांडी कापताना दोन डोळे ठेवावेत. येथूनच नवीन दांडी वाढत असते. वेळोवेळी दांडीचे फुटवे वाळलेल्या फांद्या काढत रहावे लागते. काहीवेळा पानांचे क्षेत्र वाढवण्यासाठी लहान, अशक्त फांद्या वाकवल्या जातात.

खत व्यवस्थापन Rose Farming In Polyhouse :-

लागवडीनंतर प्रत्येक रोपास १५ दिवसांनी १० ग्रॅम युरिया, एक महिन्यानंतर १० ग्रॅम डाय अमोनियम फॉस्फेट आणि दोन महिन्यांनी २ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट व कॅल्शियम द्यावे दुसऱ्या वर्षापासुन हेक्टरी शेणखत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश अनुक्रमे ५० टन, १२०० किलो, २४०० किलो, ६५० किलो या पद्धतीने द्यावे. तसेच स्टेरामिल १००० किलो व निंबोळी पेंड २००० किलो प्रती हेक्टरी वर्षातून समान दोन हप्त्यात द्यावे.

जून महिन्यामध्ये शेणखताची १/२ मात्रा, स्फूरद खताची १/४ मात्रा, १/४ नत्र, आणि १/४ पालाश खतांची मात्रा द्यावी. ऑक्टोबर छाटणीनंतर १/२ शेणखताची मात्रा १/४ नत्र व १/२ पालाश खतांची मात्रा द्यावी. राहीलेली १/४ नत्र व पालाश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात व पुन्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्यावे.

https://youtu.be/Z1Ofl4Y_8Fw?si=WWC5Bl8KLFftxJiE
Rose Farming In Polyhouse Full Infomation
फुलांची काढणी :-

फुलांच्या दांडीची कापणी योग्यवेळी करावी फूल (Rose Farming In Polyhouse) जर लवकर कापले तर फुलांची वाढ पुरेशी अन्नद्रव्याअभावी अपूर्ण राहील यामुळे त्याचे पूर्ण फुलात रूपांतर होणार नाही. त्याचबरोबर त्याचा टिकण्याचा कालावधी कमी होईल. यासाठी गुलाबाचे फूल अर्धवट उमलेल्या कळी अवस्थेत कापावे हे काम सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानाच्या वेळी करावे. कापलेली फुले ताबडतोब पाण्यात ठेवावीत.

हे ही वाचा:- गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का,हिवाळ्यात तर प्यायलाच हवा

काढणीत्तोर तंत्रज्ञान Rose Farming In Polyhouse :-

कापलेली फुले पाण्याच्या बादलीत ठेऊन प्रिकुलींग रूममध्ये ठेवावीत हा कालावधी सर्वसाधारणत ४ तासांचा असतो. यामुळे फुलांचे तापमान कमी होते. प्रिकुलींग मध्ये तापमान ६ ते ८ सें.ग्रे. ठेवलेले असते. तापमान कमी केल्यामुळे फुलांची श्वासोच्छवासाची क्रिया मंदावली जाते. फुलावर बाष्प साठून रहात नाही तसेच इथिलीन गॅस कमी तयार होतो व त्यामुळे फुलांचा टिकण्याचा कालावधी वाढतो.

पॅकींग / ग्रेडींग :-

प्रिकुलींग केलेली फुले प्रतवारी करण्यासाठी घेतली जातात. यामध्ये फुलांची प्रत व दांड्याची लांबी नुसार प्रतवारी केली जाते. निवडलेल्या फुलांचे दांडीच्या लांबीनुसार वर्गीकरण केले जाते. यामध्ये ४० सेंमी, ५० सेंमी व ६० सेंमी असे मुख्यतः तीन गट तयार केले जातात. प्रतवारीनंतर बाजारपेठेच्या मागणीनुसार २० किंवा १० फुलांचे बॅच / गठ्ठे बांधले जातात Rose Farming In Polyhouse.

बॅच बांधलेली फुले कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणुकीसाठी ठेवली जातात. शीतगृहामध्ये २-४ सें.ग्रे. तापमान नियंत्रीत केले जाते. थंड तापमानामुळे फुलांचा आकार किंचितसा वाढला जातो. बाजारपेठेच्या मागणीनुसार गठ्ठे बांधलेली फुले शीतगृहामधून बाहेर काढून १००x ४०× २० सेंमी आकाराच्या कोरूगेटेड बॉक्समध्ये पॅक केली जातात. एका बॉक्समध्ये साधारणतः ३००-४५० फुले ठेवली जातात.

उत्पादन :-

सर्वसाधारणपणे ५०० चौ.मी. च्या हरितगृहामध्ये ४००० रोपे लागवड केली जातात. व त्यापासून १,२०,००० ते १,५०,००० फुले प्रती वर्षी एवढे उत्पादन मिळते. प्रत्येक फुलास बाजारभाव २-३ रु प्रति फूल एवढा मिळतो. अशा प्रकारे हरितगृहामध्ये गुलाबाची लागवड करून कमी क्षेत्रामध्ये भरघोस व चांगल्या प्रतीचे उत्पादन घेऊन जास्त नफा मिळविता येतो Rose Farming In Polyhouse

2 thoughts on “Rose Farming In Polyhouse Full Infomation : पॉलिहाऊस मधील गुलाबशेती संपूर्ण माहिती”

Leave a Comment