तुम्ही 18 वर्षाचे झालात, तर हे 10 दस्ताऐवज लगेच घ्या काढून; पहा संपूर्ण माहिती | Top 10 important work after 18 age completed in india

Top 10 important work after 18 age completed in india: नमस्कार मित्रांनो, तुमचं वय जर 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्हाला ही दहा महत्वाची कामे करणे गरजेचे आहे. यामध्ये काही डॉक्युमेंट्स असतील आणि काही कामे सुद्धा असतील तर ही दहा कामे नक्की कोणकोणती आहेत. आणि यासाठी आपल्याला काय करावे हे या लेखामध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा, हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Top 10 important work after 18 age completed in india

१) १८ वर्ष वय पूर्ण झाल्यावर सर्वात आधी आपले मतदानकार्ड काढा..

सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे तुमचं वय अठरा वर्ष जर पूर्ण झाले असेल तर पहिलं काम करायचं ते म्हणजे तुमचं मतदान कार्ड काढून घ्यायचं. (Voter Identity Card ID) आत्तापर्यंत जर तुम्ही मतदान कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर लवकर काढून घ्या. आता २०२४ च्या निवडणुका येत आहेत. तर त्यासाठी तुमचं मतदान यादी मध्ये नाव लावून घ्या. मतदान कार्ड हे कसं काढायचं असा तुम्हाला प्रश्न असेल तर तूम्ही घरबसल्या मोबाईलवरून मतदान कार्डसाठी अर्ज करु शकता.

२) पॅनकार्ड साठी अर्ज करा.

त्यानंतर दुसरे महत्वाचे काम आहे ते म्हणजे अठरा वर्षे पूर्ण असेल तर पॅन कार्ड (Apply Pan Card) काढून घ्यायचे, तुम्हाला पॅन कार्ड हे कशासाठी काढायचं तर बँकेमध्ये तुमचे जे काही अकाउंट असेल तर त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड जमा करावे लागणार आहे. आणि व्यवहार तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर व्यवहार करावे लागतील. आणि जास्त व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. तर आतापर्यंत पॅन कार्ड काढला नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड सुद्धा काढून घ्या.

३) वाहनचालक परवाना काढून घ्या.

त्यानंतर तिसरे महत्वाचे काम आहे ते म्हणजे, तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) काढून घ्यायचे आहे. तर ड्रायव्हिंग लायसन्स वय वर्ष १८ पूर्ण झाल्यावर आपल्याला वाहन चालवण्यासाठी खूप महत्वाचे असते.

४) आधार कार्ड अपडेट करा.

त्यानंतर तुम्हाला चौथं काम काम करायचे आहे जे सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्ड अपडेट का करायचं, कारण असे कि आधारवरील आपला फोटो जुना असतो. आपल्या आधार कार्ड वरील माहिती हि जुनी असेल तर अपडेट करणे गरजेचे असते. आपलं बायोमेट्रिक अपडेट करून घ्या, फोटो अपडेट करून घ्या, जर काही चुकीचं झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करून घ्या. आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. अठरा वर्ष झाल्यानंतर अनिवार्य सुद्धा आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा.

५) आवश्यकता असेल तर पासपोर्ट काढून घ्या.

यानंतर पुढील महत्वाचे काम आहे ते म्हणजे जर, तुम्हाला आवश्यकता असेल तर पासपोर्ट तर पासपोर्ट काढून घ्या. भविष्यात जर नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी तुम्हाला विदेशात जावं लागलं तर पासपोर्ट आवश्यक असेल. भविष्यात होणारी धावपळ वाचवण्यासाठी तुम्ही आताच पासपोर्ट काढून ठेवू शकता.

६) तुमचे बँक अकाउंट ओपन करा.

त्यानंतर बँकेत जाऊन आपले सेव्हिंग अकाउंट ओपन करा. जर आधीचे तुमचे विद्यार्थी अकाउंट असेल तर तुम्ही ते सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून शकता.

७) तुमची स्वतःची SIP सुरु करा.

त्यानंतर ७ वे महत्वाचे काम आहे कि जे कि ऐच्छिक आहे, तुमची स्वतःची SIP सुरु करा. भविष्यात गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही SIP सुरु करू शकता.तुम्ही तुमचे स्वतःचे Mutual Fund अकाउंट ओपन करून हे करू शकता.घरून मिळणारी पॉकेटमनीची बचत करून सेविंग करू शकता. एसआयपी मधून सगळ्यात जास्त रिटर्न भेटतात हे भरपूर जणांना माहीत सुद्धा असेल. वर्षांनी, पाच वर्षांनी, दहा वर्षांनी, पंधरा वर्षांनी असे भरपूर चांगले रिटर्न एसआयपी मधून भेटतील. फक्त यासाठी अभ्यास आवश्यक आहे..

८) तुमचे पीपीएफ अकाउंट सुरु करा.

त्यानंतर ८ वे काम सुद्धा ऐच्छिक आहे. जर तुम्हाला पीपीएफ अकाउंट काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता.भविष्यात चांगल्या परताव्या साठी इतकं टॅक्स मध्ये सवलत मिळवण्यासाठी तुम्ही PPF अकाउंट सुरु करू शकता.हे तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन हे करू शकता.

९) तुमचे उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्र काढू ठेवा

त्यानंतर दोन महत्वाची कामे आहेत आपले उत्पन्न प्रमाणपत्र आणि डोमिसाईल प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घ्या. डोमिसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्रात राहतो त्यासाठी आवश्यक आहे. हि कागदपत्रे तुम्हाला शैक्षणिक सवलती आणि नोकरीच्या वेळी हे महत्वाचे आहे.

अशाप्रकारे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यावर आपण आपले वरील कामे पूर्ण करून आजच्या या स्पर्धेच्या काळात स्वतःला अपडेट ठेऊ शकता.

मिंत्रानो हि माहिती आपल्यासाठी महत्वाची आहेच पण आपल्या मित्रांसाठी देखील खूप महत्वाची आहे तेव्हा आपल्या मित्रांना देखील हि माहिती शेअर करा.

हे देखील वाचा हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

अशी करा FASTAG KYC UPDATE, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय जाणून घ्या.

Best Investment Schemes for Daughters : मुलीच्या भविष्यासाठी या योजना आहेत खूपच फायदेशीर

2 thoughts on “तुम्ही 18 वर्षाचे झालात, तर हे 10 दस्ताऐवज लगेच घ्या काढून; पहा संपूर्ण माहिती | Top 10 important work after 18 age completed in india”

Leave a Comment