Winners Of The Filmfare OTT Awards 2023 : फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची यादी जाहीर! उत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Winners Of The Filmfare OTT Awards 2023 : मनोरंजन विश्वातील कलेचा गौरव आणि सन्मान करणारा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार रविवारी (26 नोव्हेंबर 2023) मोठ्या थाटामाटात पार पडला. या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्याला मनोज बाजपेयी, राजकुमार राव,आलिया भट्ट, सोनम कपूरपर्यंत सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टला (Alia Bhatt) वेब ओरिजिनल फिल्म (महिला) मध्ये डार्लिंग्जसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राजकुमार रावला त्याच्या नेटफ्लिक्स चित्रपट मोनिका ओ मायसाठी समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. तसेच करिश्मा तन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांना अनुक्रमे स्कूप आणि दहाडसाठी समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मालिका (महिला) पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान विजय वर्माला दहाडसाठी पुरुष गटात समान पुरस्कार मिळाला.

Winners Of The Filmfare OTT Awards 2023
Winners Of The Filmfare OTT Awards 2023

स्कूपला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार देण्यात आला, तर ट्रायल बाय फायरने समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ट्रॉफी जिंकली. शर्मिला टागोर (गुलमोहर) आणि सान्या मल्होत्रा (कथाल) यांना समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘जुबली’ या वेबसीरिजला सर्वाधिक पुरस्कार म्हणजेच नऊ पुरस्कार मिळाले आहेत. तर आज आपण सविस्तर जाणून घेऊयात यंदाच्या वर्षीच्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:(Winners Of The Filmfare OTT Awards 2023)

Best Actor Male (कॉमेडी)अभिषेक बॅनर्जी
Best Actor Female ( कॉमेडीमानवी गागरु
उत्कृष्ट अभिनेता :मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट अभिनेत्री :आलिया भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
Best Actor Male (सीरीजविजय वर्मा, दहाड
Best Actor Femaleराजश्री देशपांडे, ट्रायल बाय फायर
Best Series (Critics)ट्रायल बाय फायर
Best Seriesस्कूप
Best Supporting Actor (मेल)बरुण सोबती – कोहरा
Best Supporting Actor (फीमेल), कॉमेडीशरनाज पटेल- TVF ट्रिपलिंग सीजन 3
Best original Story-कोहरा’- गुंजीत चोपड़ा – डिग्गी सिसोदिया
Best original Diloguesस्कूप’ साठी करण व्यास
Best original Screenplay‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – सुदीप शर्मा
Best Production Disignजुबली’ अपर्णा सूद – मुकुंद गुप्ता
Best Directrorविक्रमादित्य मोटवानी
Best Editing- ‘जुबली’ – आरती बजाज
Best Cinematography – ‘जुबली’ – प्रतीक शाह
Best Costume Design- ‘जुबली’ – श्रुति कपूर
Best VFX- ‘जुबली’ – अर्पण गगलानी
Best Background Design – ‘जुबली’ – अलोकनंदा दासगुप्ता
Best Original Soundtrack- ‘जुबली’ – अमित त्रिवेदी – कौशर मुनीर
Best sound Design – ‘जुबली’ कुणाल शर्मा – ध्रुव पारेख
BEst Non Fiction Original – TVF पिचर्स
Best Story- ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ – दीपक किंगरानी
Best Cinematography – ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – स्वप्निल सोनावना
Best Production Design – ‘कला’ – मीनल अग्रवाल
Best Editing- ‘डार्लिंग्स’ – नितिन बैड
Best Sound Design- ‘डार्लिंग्स’ – अनीरबन सेनगुप्ता
Best Background Music- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – अंचीत ठक्कर
Best Actor (फीमेल), शॉर्ट फिल्म- ‘जाहान’ – मृणाल ठाकुर
Best Actor (मेल), शॉर्ट फिल्म- ‘फिर कभी’ – मानव कौल
Best Actor (मेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – राजकुमार राव
Best Actor (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘कटहल’ – सान्या मल्होत्राबेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘गुलमोहर’ – शर्मिला टैगोर
(Filmfare OTT Awards 2023 Winner All List)

काय आहे फिल्मफेअर पुरस्कार? (Filmfare Award) :


कलासृष्टीतील सर्वात मोठा ओळखला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार हा वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारताच्या हिंदी भाषेतील चित्रपट उद्योगातील कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेचा सन्मान करतात. फिल्मफेअर समारंभ हा भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट कार्यक्रमांपैकी एक आहे. टाइम्स ग्रुपच्या फिल्मफेअर मासिकाने 1954 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून हे पुरस्कार सुरू केले आहे.

या पुरस्काराचे सुरवातीचे नाव द क्लेअर्स असे होते, ज्याचे नाव टाइम्स ऑफ इंडियाचे समीक्षक क्लेअर मेंडोन्का यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. फिल्मफेअरच्या वाचकांचे विजेते ठरवण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि भारतभर पसरलेल्या 20,000 हून अधिक वाचकांनी मतदानात भाग घेतला जातो. यावेळी लोकप्रिय मतांच्या विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येते. 21 मार्च 1954 रोजी मुंबईच्या मेट्रो थिएटरमध्ये झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्यात, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक असे फक्त पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

फिल्मफेअर अवॉर्डमध्ये रेड कार्पेट हा महत्वाचा भाग असतो (Red Carpet):


फिल्मफेअर अवॉर्डमध्ये रेड कार्पेट हा महत्वाचा भाग असतो. कारण रेड कार्पेट हा एक भाग आहे जो वास्तविक समारंभाच्या सुरुवातीपूर्वी होतो. अभिनेता, अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार आणि इतर ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे अशांची ओळख रेड कार्पेटमधून होते.

(Filmfare Award) : 2023

New Royal Enfield Shotgun 650 दाखल, आश्चर्यकारक डिझाईन फक्त निवडक ग्राहकांसाठी..

Leave a Comment