yoga tips in marathi : मित्रांनो सध्याची जीवनशैली खूपच धकाधकीची आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्रीच्या जागरणामुळे झोप पूर्ण न होणे इत्यादी अनेक कारणांमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांनी लोकांना ग्रासले आहे. या मुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.जर तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली किंवा कोणतेही काम केले नाही तरी सुद्धा तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत राहतो.
yoga tips in marathi
मात्र, केवळ झोपून, या समस्येचे निराकारण होणार नाही. यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.जर तुम्ही नियमितपणे योगासनांचा सराव केला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुमचा स्टॅमिनाही वाढण्यास मदत होईल. यामुळे, तुमचे शरीर उत्साही आणि तंदूरूस्त राहील. जर तुम्हाला शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही या योगासनांची मदत घेऊ शकता. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
धनुरासन
धनुरासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला तर, शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल. एवढेच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी देखील तुम्ही या योगासनाचा नियमितपणे सराव करू शकता.
हे धनुरासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. आता तुमच्या दोन्ही पायांचे घोटे हातांनी पकडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर, डोके, छाती आणि मांड्या वरच्या बाजूला सरळ स्थितीमध्ये ठेवा. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराचे वजन पोटाच्या खालच्या भागावर तुम्हाला जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये रहा त्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. नियमितपणे या योगसनांचा सराव केल्याने, तुमच्या शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होऊ शकेल. (Dhanurasana)
ताडासन
उंची वाढवण्यासाठी आणि शरीराला ताण देण्यासाठी हे योगासन अतिशय लाभदायी आहे. या योगासनामध्ये संपूर्ण शरीर ताणले जाते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. आता दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. त्यानंतर, दीर्घश्वास घेऊन हात वर करा आणि ताणून घ्या.
आता दोन्ही पायांच्या टाचा उंचावताना पायाच्या बोटांवर उभे राहा. आता या स्थितीमध्ये तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागात ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन १० ते १५ वेळा नियमितपणे करा तुमचा थकवा काही दिवसांमध्ये दूर होईल. (Tadasana)
सेतूबंधासन
हे योगासन आपल्य शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. सेतूबंधासन योगासन रोज केल्याने तुमचे शरीर लवचिक होण्यास मदत होईल. शिवाय, शरीरात चपळता येईल.
हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
- सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर पालथे झोपा आणि हलका श्वास घ्या.
- त्यानंतर, दोन्ही हात बाजूला ठेवा.
- आता सावकाशपणे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून नितंबाजवळ आणण्याचा प्रयत्न करा.
- या स्थितीमध्ये कंबर जितकी वर उचलता येईल, तितकी उचलण्याचा प्रयत्न करा.
- दोन्ही हात मात्र, जमिनीवरच ठेवा आणि १५ सेकंदासाठी श्वास रोखून धरा. आता तुम्हाला शरीराला चांगला ताण बसलेला जाणवेल.
- यानंतर, श्वास सोडून पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
बालासन
शरीरातील सर्व आळस आणि थकवा दूर करण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीर रिलॅक्स ठेवण्यासाठी प्रामुख्याने हे योगासन केले जाते.
हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी योगा मॅटवर वज्रासनात बसा.
- आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ रेषेत न्या.
- आता श्वास सोडत दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.
- या स्थितीमध्ये तुमची पाठ सरळ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे डोके जमिनीला टेकवा.
भुजंगासन
- जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा.
- दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या..
- हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत.
- एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात.
- आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा.
- लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात
- पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.
- लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.
- तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा.
- आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
- श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.
मिंत्रानो आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, हेल्थसंदर्भात अधिक टिप्ससाठी आमच्या आरोग्य या पेजला भेट द्या. आणि सतत हेल्दी आणि फिट रहा.